तुझे पांग कसे फेडू!!!!!!

Started by amit5, October 15, 2012, 11:06:48 AM

Previous topic - Next topic

amit5

तुझे पांग कसे फेडू!!!!!!

जेव्हा होतो मी तान्हुला,
मज काळात नव्हते काही,
तेव्हा तूच मला जपले,
तुझे सर्व आयुष्य माझ्या सुखासाठी अर्पिले,
मला कळत नाही आई, तुझे पांग कसे फेडू ,
तुला अस काय बरे देऊ.....

त्यावेळी जरी मज कळत नवते काही,
पण आजही त्या मायेचा मज विसर पडला नाही,
मला कळत नाही आई, तुझे पांग कसे फेडू ,
तुला अस काय बरे देऊ.....

होतो मी जरी अजाण,
तरी करीत होतो फार कारस्थान,
तरी तू मजवर केली इतकी माया,
इतकी थोर तुझी काया,
मला कळत नाही आई, तुझे पांग कसे फेडू ,
तुला अस काय बरे देऊ.....

आज कदाचीत असेलही मी जाणता,
तरी आहेच तुझा ग तान्हुला,
मला खंत इतकीच आई,
की तू आज मज जवळ नाही,
मला कळत नाही आई, तुझे पांग कसे फेडू ,
तुला अस काय बरे देऊ............................

मित्रानो इथे मी माझ्या भावना स्वतः रचलेल्या दुसऱ्या कवितेद्वारे व्यक्त केलेल्या आहेत. आवडली तरी नक्की लाईक करा बर का .............आणि आपले काही विचार असतील तरी तेही मला सांगा

तुमचाच
अमित माहोरे