फक्त एकदाच....

Started by Shrikant R. Deshmane, October 16, 2012, 09:54:20 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

फक्त एकदाच तुला मनसोक्त हसताना बघायचं...
निदान त्यासाठी तरी मला विदुषक बनून तुझ्या समोर यायचं,

फक्त एकदाच तुझ्या मनातला सारा काही जाणून घ्यायचं,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवून तासंतास बसायचं,

फक्त एकदाच तुझ्या मौषर केसातून हळुवार हात फिरवायचं,
निदान त्यासाठी तरी एकदा तुझ्या केसात गजरा घालायचं,

फक्त एकदाच तुला माझ्यासाठ बैचैन होताना बघायचं,
निदान त्यासाठी तरी ठरवलेल्या वेळे पेक्षा थोडा उशिरा यायचं,

फक्त एकदा तुला अनिवार रडताना बघायचं,
निदान त्यासाठी तरी मला खोटा खोटा मारायचं....
निदान त्यासाठी तरी मला खोटा खोटा मारायचं....

                                                                       ----unknown
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]