मनोरम्य स्वप्न ते...New Video

Started by Sadhanaa, October 18, 2012, 10:45:37 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मनोरम्य स्वप्न ते...New Video

मनोरम्य स्वप्न तें   उघड्या डोळी पाहिले
जीवनांत शक्य तेवढे  सुख तेव्हां मिळविले ।
आलीस तूं जेंव्हा सखये  नव्हती मजला कल्पना
आपुल्या भेटीत मिळतील  हृदय अपुल्या हृदयांना ।
होते न ओळख थोडी  आपणास अपुल्या मनाची
शिक्षा मिळे क्रूर तेव्हां  भयंकर एकाकी विरहाची ।
कां खेळ अघटीत हा  असा दैवाने खेळावा
मिळालेला एक आसरा  एकाएकी दूर करावा ।
आज जरी असूं आपण  दूर दूर कोस हजार
अद्रूष्य ह्या अंतराने  मानु न जीवनी हार ।
मने आपुली आज असती  जवळी एकमेकांच्या
कुणा नकळत करुं गोष्टी  आपण अपुल्या हृदयीच्या ।
परि मना लागते आस  नेत्रीं तुला पाहण्याची
अन् भेटीत रम्य तुझिया  आग विझण्या हृदयीची ।
कधीं पुन्हां येईल वेळ  सखे तुझिया मीलनाची
आता फक्त एकच आशा  कधी येशील कायमची ।।

रविंद्र बेंद्रे
please click here to watch
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_693.html