मराठी माणसा...

Started by बाळासाहेब तानवडे, October 19, 2012, 02:56:11 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे



मराठी माणसा...

मराठी माणूस म्हणतात धंद्यात कमी.
केला  धंदा तरी   नाही  सुयशाची हमी.
आता  द्यायचाय छेद , या समजुतीला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

उच्च  शिक्षणाच्या उत्तुंग पदव्या घेतो.
आयुष्यभर नोकरीतच धन्यता मानतो.
आता विचार धाराच बदलायचीय मुला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

रिस्क जोखीम म्हणून टाळतच आला.
जीवनात कुठे नाही रिस्क ते तर बोला.
आता  हा धाडसी निर्णय पक्का झाला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

एवढ्यावरच  समाधान तुजला नसावं.
आता  सुंदरशा  स्वप्नांच  जग सजावं.
सज्ज हो सारी दुनिया कवेत घ्यायला.
एक यशस्वी उद्योजक व्हायचंय तुला.

कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे  १९/१०/२०१२
http://kavyarangmaze.blogspot.in/


केदार मेहेंदळे

#1
वा वा बाळासाहेब काय लिहिलेत तुम्ही
मराठी  माणसाला  अशक्य काही नाही   

रिक्शा न ट्याक्सी चालवण्यात  नाही
कमीपणा काही
हाटेल उड्प्याचिच असावी
असही मुळीच नाही 
मासे अन आंबे तर होतात
आपल्याच दारी
म्हणून म्हणतो परप्रन्तियांची इथे
कही गरजच नाही   

गर्जा महाराष्ट्र माझा!
जय जय महाराष्ट्र माझा!     

बाळासाहेब तानवडे

केदारजी.... खुप धन्यवाद..


बाळासाहेब तानवडे

धन्यवाद मंदार ......