मी कवी नाही

Started by SANJAY M NIKUMBH, October 20, 2012, 11:04:41 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी कवी नाही

मी छान लिहितो
असं जवळचे म्हणतात
मी भावना व्यक्त करतो
त्यालाच कविता समजतात
पण मीच स्पष्ट करतो
मी कुणीही कवी नाही
हे जे काय लिहितो
त्याच श्रेयही माझं नाही
ती जीवनात आली
न सहवासात गुंतत गेलो
काही कळलं नाही
शब्दात कसा हरवत गेलो
माझ्या कविता म्हणजे
तिचा न माझा संवाद असतो
ती जवळ नसतांनाही तिच्याच धुंदीत
जगण्याचा एक बहाणा असतो
तीच शब्द रूप होऊन
मला भेटत असते
माझं मन फक्त
कागदावर उतरवत असते
हे शब्दच माझं आता
जगणं झालं आहे
मी कवी नाही
एवढंच सांगण आहे .
           
                                   संजय एम निकुंभ , वसई
                                 दि.१३.१०.१२ रात्री . २.३० व
ा.

केदार मेहेंदळे