सवयच आहे तिला ...सवयच आहे मला

Started by Sameer Nikam, October 23, 2012, 10:18:17 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

सवयच आहे तिला
रोज विनाकारण माझ्यावर चिडण्याची
उगाच गाल फुगवून रुसून  बसण्याची

सवयच आहे मला समजूत तिची घालण्याची
त्यात हि ती नाक मुरडायची
पण रागावल्यावर खूप सुंदर दिसायची

सवयच आहे तिला
कधी कधी मला खूप मारण्याची
स्वतःलाच लागले म्हणून ओरडण्याची

सवयच आहे मला खोटे खोटे नाटक करण्याची
त्यातही ती मला जवळ घ्यायची
लागले का म्हणून प्रेमाने विचारायची

सवयच आहे तिला
विनाकारण कोणत्याही गोष्टीवर भांडण्याची
उगाच चिडचिड करण्याची

सवयच आहे मला भांडण्यातला गुंता सोडवण्याची
त्यातही माझ्या चुका ती शोधायची
मधेच सारे विसरून मला प्रेमाने मिठीत घ्यायची

सवयच आहे तिला
भेटल्यावर मी उशिरा आलो म्हणून वाद घालण्याची
माझ्याशी कट्टी घेवून शांत बसण्याची

सवयच आहे मला समजूत तिची काढण्याची
पुढल्या खेपेस लवकर ये म्हणून वचन ती मागायची
मन तिचे शांत होताच हातात हात धरून फिरायची

सवयच आहे तिला
जाताना घरी लहान मुलासारखे रडण्याची
अलगद गालावर मुका देण्याची

सवयच आहे मला स्वतःचे दुख लपवण्याची
जाताना हसत जा म्हणून तिला सांगायची
ती पुढे गेल्यावर स्वतःचे डोळे पुसण्याची 

समीर सु निकम

केदार मेहेंदळे