हि असताना हि. . .

Started by tanmay20, October 26, 2012, 11:58:46 AM

Previous topic - Next topic

tanmay20

हि असताना हि, तुला विसरणं शक्य होत नाही
तू होतीस तरीही, हिला लाईन देण्यात काही वावग वाटल नाही.

मिठीत एकदा मावलो असता तुझ्या
हि लांबूनच खुदकन हसली
आज हिला मिठीत घेत असता माझ्या
जणू अंगाला तुझीच उब भासली

पुढे याच तिच्या हसण्याचं कुतूहल एवडं वाढलं
कि वेड तुझ्या खळीचं त्यात मावळलं
आज त्याच तिच्या हसण्याचं वेड कधी सरलं
कि मन परत तुझ्याच खळी कडे रेंगाळलं

हळूहळू तुझ्या नजरा चुकवत, हिच्याशी सुरु झाला इशार्यांचा खेळ
मग काय, रोज संध्याकाळी हातात हात आणि चौपाटी वरची भेळ
पण आज ह्याच चौपाटी चा मावळता सूर्य हि भयाण वाटतो
जणू काय साक्षच होता तो, आठवयास, तुझ्या माझ्या प्रेमाची वेळ

शेवटी तुला साफ टाळत, हिच्याच कडे मन धावलं
आकर्षणाचा प्रेम कधी झालं, मलाच नाही कळलं
आज हिच्याच डोळ्यात तुला शोधत असताना मला पटलं
खरं तर हेच आकर्षण, प्रेम तर मी तुझ्यावरच केलं

असंच एकदा समुद्रकिनारी हिनेच विचारलं, माझ्यावर प्रेम करतोस काय ?
नेमका तेव्हाच तुझा मेसेज आला, तू मला विसरलास तर न्हाय ?
आज माझं मन म्हणतंय मला, मी हिला विसरायास तैय्यार हाय
पण तेच मन कचरतं, विचारयास तुला, माझ्यावर पुन्हा प्रेम करशील काय ?

शेवटी आज त्याच समुद्रकिनारी, तोच सूर्य बगत, हिलाच बिलगून मी बसलोय
हिच्याच हातातल्या निसटत्या वाळूत, जणू आपल्याच उरल्या सुरल्या आठवणी मी शोधतोय
तू नसलीस, तरी आता हिच्यातच तू , असं आपल्याच मनाला सारखं बजावतोय
हो ? आतातरी नक्की हीच का ? असा म्हणत मन माझीच खेचतोय

कारण,,,,
हि असताना हि, तुला विसरणं शक्य होत नाही
तू होतीस तरीही, हिला लाईन देण्यात काही वावग वाटल नाही.

                                                                             .... तन्मय सिंगासने

कवि - विजय सुर्यवंशी.

   apratim/...