मी मराठी

Started by केदार मेहेंदळे, October 30, 2012, 11:46:38 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

नुकताच 'झी मराठी' वर झी गौरव पुरस्कार' हा प्रोग्राम झाला. नेहमी प्रमाणे ह्या वेळी सुध्धा हिंदी गाण्यांवरच नाच झाला. असं का होतं? मराठी गाण्यांची लाज वाटते का मराठीत नाचण्या सारखी किंवा रोम्यांटिक गाणीच नाहीत असं संयोजकांना वाटतं? 

झी मराठी, इ मराठी
नावातच ह्यांच्या 'मी मराठी'
गौरव पुरस्कारात मात्र नेहमी
नाचायला मिळतात हिंदीच गाणी

'मराठी पाउल पडते पुढे'
मग गाण्यातच का आम्ही उणे?
'महाराष्ट्र कलांची पंढरी' तरी
नाचायला हवे हिंदीच गाणे

मी तरी नाही पाहीलं कधी
हिंदी प्रोग्राम मध्ये मराठी गाणे
मग आम्हालाच का लागतात नेहमी
मराठी प्रोग्राम मध्ये हिंदी गाणे?

कमी आहेत का मराठी मध्ये
गाणी. ठुमके आणि लावण्या?
पाहिजेत कशाला मराठी प्रोग्रामला
हिंदी गाण्याच्या कुबड्या?

मुंबई मधल्या हिंदी सिरियल्स मध्ये
कामवाली नेहमी मराठीच असते
हिंदी भाषिक कामवाली मग
का नसते मराठी सिरियल्स मध्ये?

हिंदी च्यानल्स च्या सिरियल्स मध्ये
मराठी कुटुंबही बोलतं हिंदी
जगात सगळे समजत असतील
महाराष्ट्रात घरात बोलतात हिंदी.

मोठे मोठे च्यानल्स ह्यांच्या
मोठ्या मोठ्या बाता
मराठी मराठी म्हणून आम्हाला
मूर्ख बनवण्याचा धंदा

कोण म्हणतं हिंदीच्या कुबड्यांशिवाय
मराठी च्यानल चालणार नाही?
थांबवली नाहीत घुसखोरी तर, महाराष्ट्रात
हिंदी च्यानल्स दिसणार नाहीत.

काढू आता कानाखाली
'खळफटक' चा दणका
घुसवाल मराठी प्रोग्राम मध्ये
जर हिंदी गाण्यांचा ठुमका


केदार....


विक्रांत

एकदम खळफटक !!!!!!!!!! कविता