मन उदास असलं तर ...Please click here to listen.

Started by Sadhanaa, November 03, 2012, 05:36:46 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मन उदास असलं तर ...

मन उदास असलं तर
           औदासिन्य वाढत जातं
काळजीनं तसच उगाच
          मन-शरिर घंगत जातं ।
स्वैर फक्त विचारानं
         कष्ट दूर होत नाहीं
धैर्य मनी नसेल तर
        जीवन जगता येत नाहीं ।
मनाचा अन शरीराचा
        जवळचा संबंध आहे
एकमेकांच्या संसर्गानं
        दोन्हीवर परिणाम होत आहे।
आचार आणि विचार
        ह्यांची शिडी बनली आहे
त्याच्याच आधारे मनुजास
        इष्ठ मंदिर गाठायचं  आहे ।
दूर नाहीं यशोमंदिर
       श्रद्धा जर मनीं असेल
आत्म बलानेच जीवनांत
       प्रकाशाचा मार्ग दिसेल ।
भाव लिहिले शब्दांत
      मनोधैर्य देण्यासाठी
देव नाहीं इतका निष्ठूर
      हेंच पुन्हां सांगण्यासाठी ।।


रविंद्र बेन्द्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please click here to listen.

[/size][/b]
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_2.html

केदार मेहेंदळे