।। चकवा ।।

Started by श्रीमति प्रतिभा गुजराथी, November 06, 2012, 10:37:51 AM

Previous topic - Next topic
।। चकवा ।।

काफिल्यातुन चुकलो मी
झाला कसा हा चकवा
वाटे अजुनि मनाला
एकान्त हा फसवा ।१।

फिरतो वणवण रानोमाळी
देऊ कुणा मी हाळी
सारेच ऒसाड येथे
सोबतीला माझीच सावली ।२।

केलासे कंठशोष भारी
माझीच हाक येई माघारी
हरपूनि क्षुधा-तृषा सारी
करतोच आहे मुशाफिरी ।३।

होतात भास-आभास मनांतरी
चाहूल लागते हळूच कुणाची-तरी
व्याकुळलेल्या तना-मनास
मृगजळ ही वाटते अमृतापरी ।४।

सापडेन का कधी मी कुणाला
जरी शोधत येतील ते मला
शोधतो आहे कोण कुणाला
समजणार नाही ते जगाला

               - श्रीमति प्रतिभा गुजराथी

केदार मेहेंदळे


shashaank