सांगतो आता कहाणी...

Started by Sadhanaa, November 07, 2012, 02:09:49 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

सांगतो आता  कहाणी ...

सांगतो आता  कहाणी
पॉकेट म्हणजे खिशाची
रम्य ती नसली तरी
आहे करुण विनोदाची ।
त्या मागील काळाची
आज फक्त आठव येते
जेव्हां खिशांत पैसे घेऊन
लोक बाजारांत जात होते ।
खिशामधील पैशाने
पिशवीभर बाजार येत होता
लोक म्हणतात तरीही
खिशांत पैसा रहात होता ।
आज बाजार खिशांत
पैशासाठी पिशवी लागते
तरीही माणसाला
खिशांत हलके हलके वाटते ।

खिशाचा आकार सुद्धां
दिवसे दिवस बदलत आहे
वीतभर होता तो आतां
चिमूटभर झाला आहे ।
हळु हळु जागा त्याची
इकडून तिकडे फिरत आहे
कारण आजकाल तो
निरुपयोगी ठरला आहे ।
घांस पॉकेट मारांचा हिरावून
त्याने घेतला आहे 
कारण पैशाऐवजी आतां
त्यांत रुमाल नि कंगवा आहे ।
म्हणून पॉकेटमार सारे 
प्रार्थना रोज करतात
जुना' जमाना येऊन
खिसा मोठा होऊ दे म्हणतात ।।
रविंद्र बेन्द्रे



ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_6.html

केदार मेहेंदळे