मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, सुख-दुःख आणि मित्र-प्रेम यावर कविता-गीत ऐकवितो. "राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही निशा-मंगळवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-(राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है)
-----------------------------------------------------------------------
"आता चिंता कसली तुला माणसा, दुःखे येतंच असतात जीवनात सहसा !"
---------------------------------------------------------------
आता चिंता कसली तुला माणसा,👍
दुःखे येतंच असतात जीवनात सहसा !
आता चिंता कसली तुला माणसा,
दुःखे येतंच असतात जीवनात सहसा !
असा नाही कोणी आला जन्माला,
घेऊन मुखात सोन्याचा चमचा !
आता चिंता कसली तुला माणसा,
दुःखे येतंच असतात जीवनात सहसा !
ती चिंता जाळून टाक कायमचीच,
नाहीतर समस्या उद्भवेल तुझ्या चितेचीच.
सुख काय आणि दुःख काय
दोन्ही हातात हात घालूनच चालतात✌
सुख नाही नशिबात, बिघडत नाही,
दुःखालाच सुख मानून सारे चालतात.
सुख काय तर नावालाच असतं😊
जणू अळवावरचं ओघळणारे पाणी
दुःखाला आपला म्हणण्यात आहे शहाणपण,
आळवायला शिका तुम्ही दुःखाची कहाणी.
सुख एक सावली असते थोडाकाळ
येत असते, निघून जात असते
दुःखाचे चटके सहन करावेच लागतात,😒
थोडे-थोडके नाही, तर ते टिकते चिरःकाल.
मंजिल दूर असली तर काय
अंतर जास्त असले तरी तमा नाय
आम्हा मित्रांचे प्रेमच तारून नेईल,
एकमेकांचा आधारच आमचा मित्र होईल.
पायात काटे टोचले तरी बेहत्तर
या वाटेला आम्ही करू निरुत्तर
तुझी साथ काय कमी आहे मला,
गिरी-शिखरे लांघून नेईल ती मला.
दुःखित निराधारांचा मला दिसतोय आधार
आशेचे दीप जळताहेत मार्गात निरंतर
उजळताहेत वाटा प्रत्येक वळणावरती,
दाखवताहेत दिशा दुःखितांस अंतरा-अंतरावरती.
हे जग खूप विशाल आहे
येथल्या साऱ्या वाटI एकाकीच आहेत
मित्रI तूच एक असा आहेस,
जो मला शेवटपर्यंत साथ देणार आहेस.
चिंता का करतोस माणसा ?
दुःखे येतंच असतात जीवनात सहसा !👍
चिंता का करतोस माणसा ?
दुःखे येतंच असतात जीवनात सहसा !👍
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.02.2023-मंगळवार.
=========================================