मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, भिन्न मार्गावर मार्गस्थ असणाऱ्या मित्रांची कविता-गीत ऐकवितो. "मेरा तो जो भी कदम हैं, वो तेरी राह में हैं"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही मंगळवार-संध्याकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-(मेरा तो जो भी कदम हैं, वो तेरी राह में हैं)
----------------------------------------------------
"तुझ्याच पावलांवर मी चालत👣 आहे, तुला केव्हातरी मी शोधणार आहे !"
-------------------------------------------------------------
तुझ्याच पावलांवर मी चालत आहे, 👣
तुला केव्हातरी मी शोधणार आहे !
आज जरी डोळ्यांआड असलास तू, 👀
माझी नजर तुलाच पाहणार आहे !
तुझ्याच पावलांवर मी चालत आहे, 👣
तुला केव्हातरी मी शोधणार आहे !
माझ्या मैत्रीची शपथ तुला मित्रI,
तू माझी मैत्री राखणार आहेस ! 👍
अरे आपले नाते काही आगळे नाही
आपण दोघे कधीच अलग नाही
तू मी आणि मी तूच आहोत,
आपणा दोघांना कुणीच वेगळे करणार नाही.
ज्यांच्या मनात खोट असते, तेच वेगळे होतात
ज्यांच्या मनात अढी असते, तेच जुदा होतात
आपलं मन तर बांधलं गेलंय एकत्र,
हे शरीर केवळ आहे नाममात्र.
तू माझ्यातच कुठेतरी लपला आहेस
तू माझ्यातच कुठेतरी दडला आहेस
माझं आणि तुझं अस्तित्त्व एकचं आहे,
तुझ्यात मी आणि माझ्यात तूच आहेस.
माझ्या हास्यात तू जरी नसलास 😃
तरी माझ्या अश्रूत तूच दिसत आहेस 😢
अरे तू का वेगळा आहेस माझ्यापासून,
तुझा आणि माझा आत्मा एकचं आहे.
आज आपले मार्ग भिन्न आहेत
आज आपण एकमेकांपासून दुरावलोय
आज आपला रस्ता वेगळा आहे,
तो पार करता आपण खूपच दुखावलोय.
एक दिवस असा नक्कीच येईल
जो तुझी माझी भेट घडवील
तो दिवस मला पाहायचाय, मित्रा,
तो दिवस मला स्मरणात ठेवायचाय, मित्रा.
तुझ्याच पावलांवर मी चालत आहे, 👣
तुला केव्हातरी मी शोधणार आहे !
आज जरी डोळ्यांआड असलास तू, 👀
माझी नजर तुलाच पाहणार आहे !
तुझ्याच पावलांवर मी चालत आहे, 👣
तुला केव्हातरी मी शोधणार आहे !
माझ्या मैत्रीची शपथ तुला मित्रI,
तू माझी मैत्री राखणार आहेस ! 👍
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.02.2023-मंगळवार.
=========================================