Author Topic: लग्नमंडप सजलाय मुहूर्त जवळ आलाय, मित्रा तुझ्या लग्नाला मी अंतरपाट धरलाय !  (Read 677 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 11,142
मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, जिवलग मित्राच्या लग्नाची कविता-गीत ऐकवितो. "आज मेरे यार कि शादी है, लगता है जैसे सारे संसार की शादी है"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा,व मला प्रोत्साहित करा. एप्रिल महिन्याची ही रविवार-रात्र आपणास आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे- (आज मेरे यार कि शादी है, लगता है जैसे सारे संसार की शादी है)
-------------------------------------------------------------------------

  "लग्नमंडप सजलाय मुहूर्त जवळ आलाय, मित्रा तुझ्या लग्नाला मी अंतरपाट धरलाय !"
 ------------------------------------------------------------------------

लग्नमंडप सजलाय, मुहूर्त जवळ आलाय,
मित्रा तुझ्या लग्नाला मी अंतरपाट धरलाय !
या दिवसाची माझ्या डोळ्यांना होती प्रतीक्षा,
आज माझा मित्र बोहोल्यावर चढलाय !

लग्नमंडप सजलाय, मुहूर्त जवळ आलाय,
मित्रा तुझ्या लग्नाला मी अंतरपाट धरलाय !
सुंदर वधू सजून तुझी वाट पाहतेय पलीकडे, 👰🏽
आज माझा मित्र संसार-बंधनात अडकलाय !

लग्नाच्या गाठी स्वर्गात मारल्या जातात
ब्रह्मदेव स्वर्गातच विवाह जोड्या लावतात 🚻
देवा-दिकांचा वरदहस्त असतो नवं-परिणीत वधू-वरांवर, 🤴👸🏼
पृथ्वीवर दोघे योगायोगानेच भेटत असतात. 🌍

आज मी खूप खुश आहे, आनंदी आहे 😃😊
माझा आनंद आज गगनात मावत नाही
मित्राला वराच्या रुबाबदार वेषात पाहून,
माझ्या डोळ्यांचे पारणेच फिटून जाई.

वाटतंय, आज अखिल दुनियेचे लग्न आहे
वाटतंय, आज सारा संसार विवाहात बंधत आहे
माझा मित्र मला खासच आहे, विशेष आहे,
फार दिवसांनी त्याच्या लग्नाचा योग जुळून येत आहे.

हा विवाहासाठी अगदी योग्य दिवस आहे
हा लग्नासाठी चांगला शुभ मुहूर्त आहे
आज दोन जीव एकमेकांचे होणार आहेत, 🚻
आज दोघांचे तन मन एक होणार आहेत. 💑

आज दुल्हा लग्नसमयी बावरत आहे
त्याची भोळी सुरत आणखी भोळी होत आहे
चोरटया नजरेने तो त्याच्या भावी वधूला पाहत आहे,
पुन्हा पुन्हा तिला पाहून तो अक्षरशः लाजतच आहे.

मित्राचं मन खुशीने झुमत आहे, आनंदित आहे 😊
त्याला त्याची मनपसंद वधू मिळाली आहे 👰🏽‍
संयोगाने त्याला त्याची पसंती प्राप्त झाली आहे,
आज दोघांची विवाह-गाठ बांधली जात आहे.

अरे मित्रा ऐक जर, इथे पहा जरा
तुझं नवीन जीवन आज सुरु होत आहे
तुझ्या जीवनात आज कुणी आलं आहे,
तुला ते जीवनभर साथ करणार आहे.

आज तू भलताच खुश आहेस, मित्रा
त्या खुशीतच तू आम्हाला नाचवतोयस, मित्रा 💃
पण लक्षात ठेव आमचा नाच राहिला, बाजूला
तुला आयुष्यभरच नाचावं लागेल पत्नीच्या तालावर, मित्रा. 👰🏽‍💃

आज तुझी पत्नी मनात स्वप्ने घेऊन उभी आहे 👰🏽
आज ती सोळा शृंगार करून तुला भेटत आहे
तिच्या भावनांचा मान ठेव, तिचं मन राख,
आयुष्यभर तिला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे.

वाटतंय, तुझ्या विवाहाला तारेचं तोडून आणू ⭐️ 🌟
वाटतंय, तुझ्या लग्नाला सितारेच खुडून आणू ✨
तुझा चेहऱ्याचा सेहरा मी त्यांनी सजवू,
त्यांच्या प्रकाशाने मी तुझा चेहरा प्रकाशमान करू.

तू माझा मित्र आहेस, तू मला प्रिय आहेस
तुझ्या वाटेवर मी प्रेमाची फुले उधळत आहे 🍀🌺 🌹 🥀🌿🌷🌾🌾
आयुष्यभर तू सुखात राहशील, सुखी होशील,
दुःख कोसो दूर राहील, अशी सदिच्छा करत आहे.

माझ्या मनापासून शुभेच्छा तुला आहेत, मित्रा 👍
ये, आज मला कडकडून भेट तू, मित्रा 🤝
आज खुशीचा जणू सणच आला आहे,
आज तुझं लग्न आहे, मित्रा.

वाटतंय, जणू बहार पुन्हा बहरून आलीय
पुष्प-वाटिकांना ती पुनर्जीवन देत राहिलीय
सारीकडे आनंद भरून राहिलाय, ख़ुशी वाटत राहिलीय,
माझ्या मित्राच्या आनंदाला ती वाढवत राहिलीय.

लग्नमंडप सजलाय, मुहूर्त जवळ आलाय,
मित्रा तुझ्या लग्नाला मी अंतरपाट धरलाय !
या दिवसाची माझ्या डोळ्यांना होती प्रतीक्षा,
आज माझा मित्रा बोहोल्यावर चढलाय !

लग्नमंडप सजलाय, मुहूर्त जवळ आलाय,
मित्रा तुझ्या लग्नाला मी अंतरपाट धरलाय !
सुंदर वधू सजून तुझी वाट पाहतेय पलीकडे, 👰🏽
आज माझा मित्र संसार-बंधनात अडकलाय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.04.2023-रविवार.
=========================================


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):