Author Topic: "मैत्री हि फक्त मैत्रीच असते."© चारुदत्त अघोर.  (Read 3707 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साई
"मैत्री हि फक्त मैत्रीच असते."© चारुदत्त अघोर.
एक रेशीमगाठ जी कधीच सुटत नसते,
ती भावनिक तार,जी कधीच तुटत नसते;
जी कोणत्याच अटींवर कधीच सुत्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

ती जी फक्त जिवलग्यास जोडत असते,
एकदा जुड्ल्यास कधीच परत तोडत नसते;
जणू मैत्री नात्याला सावली देणारी छत्रीच असते,
तीच मैत्री, हि फक्त मैत्रीच असते.....

भंग व्हायला अपेक्षा कधी ठेवतच नसते,
इतक्या हलक्या विचारांना सेवतच नसते;
जी फक्त निरापेक्षित प्रेमाचं चांदणं देणारी रात्रीच असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

ती मैत्रीच काय जी गमती समजत नसते,
ती यारीच काय जी नातं दृढता उमजत नसते;
काय ती वरपांगी क्षणिक दिखाऊ नाती,ज्याची खात्रीच नसते,
कारण, मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

मैत्री जी कधीच कोणतं घेणं नसते,
जी उदात्त मनी फक्त देणं असते;
जी गैरसमज या शब्दाला जोपासेल, इतकी भित्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

आजन्म हे मैत्री रोपटं,अपत्यागत जी जोपासते,
त्याची सर्व प्रयत्नी निरोगीकता तपासते;
जी किंतु-किडीत फांदीला कापती कात्रीच असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

संकुचित छोटं मन ठेऊन जगणारे,मैत्री समजू शकतच नाही,
कारण त्यांच्यात मैत्री-नातं पेलण्या इतकी ताकतच नाही;
कारण पण व परंतु,या नकारार्थी शब्दाला जी कधीच मात्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

मैत्री शिक्षा-ओझं नसून,ती कायम क्षम्यच असते,
मैत्र-जीवाच्या मन-रानि, कायम हिरवी रम्य असते;
जी कोणत्याच नियम बांधिलकीला शास्त्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

ती काहीच आठवडे टिकेल,इतकी मन-पाणी उथळ नसते,
बर्फाखडीत सहज विरघळेल,कधीच इतकी पातळ नसते;
जी विशाल अंतःकरणी मित्राच्या,कायम मिठीस पात्रीत असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

पाषाणरूपी पाझरत्या झर्याला आटवेल,इतकी कोरडी निश्चित नसते,
कायम चिटकून राहणाऱ्या सावली प्रमाणे,या नात्यास अश्वित असते;
जी जुळल्या नाती सहज तुटेल,कधीच इतकी ढिली गात्रीत नसते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते.....

मित्राचं प्रेम लाथाडेल इतकी,कपाळ-करंटी नसते,
एक घाव दोन तुकडी ठेचेल इतकी पाटा वरवन्टी नसते;
विश्वास,प्रेम,माया,याच भावनांनी जी कायम मंत्रित असते,
तीच मैत्री हि फक्त मैत्रीच असते...
चारुदत्त अघोर.


Offline bhagyashripatil

  • Newbie
  • *
  • Posts: 5
मस्त आहे. फ़्रेन्डशिप डॆ च्या शुभेच्छा. :) :) :) :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा गुणिले पाच किती ? (answer in English number):