Author Topic: प्रेम आणि मैत्री (मैत्रीदिना निमित्त)  (Read 2263 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550

 
प्रेमाच्या खळखळाच्या आत
खोलवर संथपणे वाहणारी मैत्री
हीच प्रवाहाची आधार असते
आणि त्या प्रेमाचाही
मैत्री नसलेले प्रेम असते
एक उपचार देह गरजांचा
ओढून ताणून बांधलेली मोट
आजच्या उद्याच्या व्यवहाराची
फार भाग्यवान असतात ते 
ज्यांना प्रेमाआधी मित्र भेटतात
किंवा प्रेमामध्ये मित्र गवसतात

तशी तर मैत्रीची शक्यता
प्रत्येक नात्यात असते
प्रत्येक ओळखीत असते
प्रत्येक कोंदणात मैत्री
एक बहारदार रत्न असते
म्हणूनच ज्याला असतात
अनेक जवळचे जीवाभावाचे मित्र
कुठल्याही आर्थिक सामाजिक राजकीय
किंवा वैयक्तित लाभाच्या अपेक्षेविना
केवळ निखळ मैत्रीसाठी जवळ आलेले
ते जगातील सर्वात श्रीमंत लोक असतात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


 
« Last Edit: August 02, 2015, 12:01:14 PM by विक्रांत »