Author Topic: * मिञा *  (Read 2037 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 882
  • Gender: Male
* मिञा *
« on: August 02, 2015, 05:00:56 AM »
Happy Friendship Day To All

* मिञा *
या बेदर्दी दुनियेत माझा
तसा तर कुणीच नव्हता
भेटलास तु मिञा अचानक
जणु देवच प्रकटला होता

जगण्यावर मग पुन्हा मी
प्रेम करायला लागला होता
कारण माझ्यासाठी दुनियेशी लढणारा
मिञ मला भेटला होता

आपलेच ठरले जेव्हा वैरी
तेव्हा तोच आधारस्तंभ होता
भरकटलेल्या माझ्या जीवन नौकेला
दिशा देणारा दिपस्तंभ होता

अनेकदा चुकलो असेल तरीही
कर्णा सारखा पाठीशी होता
फाटकी झोळी मज सुदाम्याची
तो जणु कृष्ण सखा होता

असा एक जीवलग मिञ
मलाही भेटला होता
देवाचा देवदुतच जणु तो
माझ्या आयुष्यात आला होता.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938

Marathi Kavita : मराठी कविता