Author Topic: >> "माझी लाडकी मैत्रिण" <<  (Read 2966 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
>> "माझी लाडकी मैत्रिण" <<
« on: April 09, 2015, 12:17:46 PM »
माझ्या एका लाडक्या मैत्रिणीला समर्पित...

>> "माझी लाडकी मैत्रिण" <<

माझी लाडकी मैत्रिण,
"स्वप्नपरी" तुझं नाव..
प्रत्येकाच्या हृदयात तुझं,
एक भलमोठं गाव..!!

डोळ्यात तुझ्या तेज,
गालावर प्रेमळ खळी आहे..
कपाळावर नाजुक टिकली,
तर मनाने हळवी आहेस..!!

तुझ्या लांब मोकळ्या केसांत,
गुलाबाचं एक फुल असतं..
तुझ्या त्या सौंदर्याला पाहून,
एकटंच बिचारं लाजत असतं..!!

गुलाबाची रेखीव लाली,
शोभून दिसते तुझ्या ओठांवर..
गोऱ्‍या हातांवर सुंदर मेहंदी,
चमकीलं नेलपेंट तुझ्या बोटांवर..!!

तुझ्या एका स्माईलवर,
मुलं बिचारी मरत आहेत..
स्वर्गातल्या या सुंदर परीवर,
सारं जग प्रेम करत आहे..!!

किती करावी तुझी तारीफ,
करील तितकी कमीच आहे..
एकटं समजु नकोस कधी,
सोबतीस तुझ्या मीच आहे..!!

हास्य कधी विसरु नको,
कारण तेच तुझं सौंदर्य आहे..
तुझी स्माईल पाहून जगणारा,
प्रेमवेडा खरा जगात मीच आहे..!!

मी सुद्धा मरतो तुझ्यावर,
खुप प्रेम करतो तुझ्यावर..
तुझ्या मैत्रीचे अनमोल बीज,
पेरतो माझ्या हृदयावर..!!
-
प्रेमवेडा राजकुमार

स्वलिखीत...
(धनराज होवाळ)
पलुस जि. सांगली
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता