Author Topic: आयुष्याच्या मार्गात,सोबत्यांची आठवण येईल का?  (Read 5289 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
कधी कधी अशी अवस्था होते कि मन शांत बसत नाही,
खूप चल-बिचल असते मनात,
खूप एकटेपणा जाणवतो,
अन त्यात मित्र-मैत्रिणींची खूप आठवण येते,
त्यांच्यासाठी एक छोटासा प्रयत्न.....

अजाण अशा वातावरणात,
कोणी एकट रहायला शिकवेल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?

मन झुरतय,आसुसलय कोणासाठी,
त्याची साद एकू येईल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?

न बोलणारं मन,
चंचल असं हृदय,
दुसऱ्यासाठी धड-धडेल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?

न मोजता येणारे सोबती,
मित्र-मैत्रिणींची येणारी आठवण,
यात अश्रूंचा मेळ घालता येईल का?
आयुष्याच्या मार्गात,
सोबत्यांची आठवण येईल का?...

                                                          .....श्रीकांत रा. देशमाने.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


praveen shedge

 • Guest

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Kiran Patil

 • Guest