Author Topic: आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...  (Read 2795 times)

Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
दररोजच जगणं चालू असत,
सकाळपासूनच मित्र-मैत्रिणींचे msg असतात,
पण अचानक काही दिवस त्यांचे msg n call नाही येत,
काय जाने काय होतं सगळ्यांना,
कोण कोणाशी बोलतच नाही, कि
आपल्याशीच कोणी बोलत नाही असा प्रश्न मनाला पडतो
अशा वेळी मित्र-मैत्रिणींची खूप आठवण येते,
त्यांच्यासाठी एक छोटासा प्रयत्न.....

आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...
सूर्याचं कोवळं उन,
हळुवार झोंबणारी थंडी,
अन साखर झोपेत असताना मित्रांचा आलेला msg,
पण आज अस काहीच नाही,
आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...

सकाळ-सकाळी मित्र-मैत्रिणीची आठवण,
त्यांना पाठवलेला msg,
अन त्यांची प्रतिक्रिया,
पण आज अस काहीच नाही,
आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...

दिवसभर येणारा कंटाळा,
त्यात मित्रांशी होणारं chating,
अन मनाला मिळणारं समाधान,
पण आज अस काहीच नाही,
आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...

संध्याकाळी थकलेला शरीर,
उडालेलं सगळं मन,
अन होण्यासाठी तळ्याकाठचा गार वारा,
पण आज अस काहीच नाही,
आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...

आज सूर्य उगवलाच नाही असं वाटतं...


                                                          .....श्रीकांत रा. देशमाने.
« Last Edit: November 23, 2012, 11:41:33 AM by श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने »
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]