Author Topic: ती सोबत तो सहवास  (Read 3013 times)

Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
ती सोबत तो सहवास
« on: January 17, 2013, 11:40:30 PM »
नाही विसरू शकत ती सोबत तो सहवास,
तुझ्या सोबत काढलेले ते तास दीडतास.

कलंदरी जगणे तुझे जवळून पाहता आले,
तूझ्या परवानगीने तुझ्या जवळ राहता आले.
एरवी एकटी एकटी असणारी तू,
अबोल असणारी तू हमखास.

कणभर सुख्खालाही तुला शिखर करता येते,
असह्य वेदनेलाही क्षणात साखर करता येते.
तुझ्या रुमालालाही नसेल स्मरत,
कधी टिपले असेल का आसवास.

आधार भंगल्या मंदिरावर तू कळस चढविलास,
कष्टांचा साज शृंगार प्रक्तांनावर मढविलास.
तुझे सहनशक्तीचे धरणे,
लाजवील कुण्या काळपुरुषास.

त्यातही तुझे स्त्रीपणाचे हसणे मोहक होते,
जरी काळजात अन्यायाचे विष दाहक होते.
भाळण्याचीही हिम्मत नव्हती,
इतका नालायक समजलो स्वतास.

तावून सुलाखल्या सोन्यापारी तुझी काया तेज धुंद,
त्या सौंदर्याने हरवली माझी तू दुख्खी असल्याची शुद्ध.
मला फसवून सरसावलेला हात,
तू सहज दूर केलास.

शरमेने गेली मान खाली तेव्हा पाठीवर ठेवलास हात,
म्हणालीस तू उंच उड मी झेलेतेय किती अपघात.
माझ्या वेदनेचा काटा,
नको तुझ्या स्वप्न फुलास.

माझ्यातही ताकद नव्हती तुझ्या वेदनेवर देण्या फुंकर,
मी फारच ठेंगणा  होतो तुझ्यासमोर खरंतर.
माझ्या ना समझत्या वयाला,
दिलास मैत्रीप्रेमाचा सुहास.

नाही विसरू शकत ती सोबत तो सहवास,
 
 तुझ्या सोबत काढलेले ते तास दीडतास.
......अमोल
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रसाद पासे

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • कवितेतून स्वतःला समजायला लागलो..
Re: ती सोबत तो सहवास
« Reply #1 on: January 18, 2013, 12:20:32 AM »
apratim...surekh lihale ahe... :)