Author Topic: मैत्री  (Read 4857 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
मैत्री
« on: April 02, 2013, 09:39:56 PM »
ओळख तुझी माझी
अनोळखी अश्या काव्यात झाली
बोलताना कळलेच  नाही
आपली केव्हा मैत्री झाली

अशीच आहेस तू वेडी
मैत्रीची घातलीस तू बेडी
देऊन विश्वास माझ्या मनाला
केलीस तू पुन्हा शब्दांची बोली

खरच तू छान आहेस
मैत्रीच  एक पण आहेस
नात्याचा एक सहवास आहेस
 आपलेपणाचा वेगळाच स्वाद आहेस

का ग तू इतकी प्रेमळ
जीन्वला जीव देणारी
दुख आलेल्या वाट्याला
पुन्हा माघार न घेणारी 

खरच तू खूप वेगळी आहेस
अनोळखी असूनही आपली वाटणारी
मैत्रीच्या वेगळ्या नात्यात
कुणालाही न सापडणारी

अशी कशी ग तू भोळी
विचारांमध्ये रमणारी
स्वताच दुख बाजूला सरकून
दुसर्याच दुख जाणणारी

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मैत्री
« Reply #1 on: May 08, 2013, 04:26:03 PM »
छान प्रयत्न आहे!!!

खरच तू खूप वेगळी आहेस ........
खरच तू खूप भोळी आहेस ........