Author Topic: मित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी  (Read 3969 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
मनाला पडलेले कोडे काही केल्या सुटेना,
    तुझ्या मैत्रीला प्रेमाचे नाव देऊ कि मैत्री, काही केल्या कळेना....!
 तुझ्या मैत्रीत अशी काही जादू आहे कि मन माझे तुझ्यात गुंतत चालले आहे,
    क्षणात वाटे कि तू हि तेच अनुभवत आहेस....!
तुझ्या बोलण्यात हरवून जाते मी, तुझ्या शब्दात मलाच शोधते मी,
   तुला सारे काही कळते, पण मीच म्हणते अरे वेड्या मित्र आहोत चांगले,
मैत्रीत असेच काहीसे वागले....!
    मैत्री आपली जपायची आहे मला,
मनातील गुपित नाही कळू द्यायचे आहे तुला....! 
कळाले जर तुला मैत्रीला नाही जायील तडा या एका भीतीने मनी एक काहूर उठे,
   आयुष्याचा जोडीदार नको रे पण एक मित्र चांगला नाही गमावू पाहत मी....!
मैत्री अशीच जपून ठेऊ आपण दोघे एकमेकांच्या मनी,
 मित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी....!!!!@ कविता @