Author Topic: मी आणि माझा ग्रुप......  (Read 7002 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
मी आणि माझा ग्रुप......
« on: October 26, 2013, 11:44:44 PM »
मी आणि माझा ऑफिस मधील गृप,
 कोणालाही आवडेल इतके दिसतो आम्ही चुप....!!!!
एकत्र असताना असते आमची धमाल,
 करून दाखवु आम्ही कोणतीही कमाल....!!!!
सिध्दी, स्वाती, श्रध्दा, निलम, आणि मी,
 मैत्री आमची अशी की 'मी' उणे होऊन दिसतो सारे आम्ही....!!!!
सिद्धी आमची नावाप्रमाणेच आहे सिद्ध,
 लहाण मुलांसम तिचे मन, निरागस तोच हट्ट अन् तशीच जिद्द....!!!!
आमची स्वाती काय सांगु हिचे,
 कधी नसे शांत स्थिर, नेहमी हिची हालचाल नेहमीच ही नाचे....!!!!
 श्रद्धा आमची जरा आगळी वेगळी,
 नेहमी लक्ष तिचे मोबाईल मध्ये असे, आवाज द्या किती तुम्ही आपल्याच दुनियेत मग्न पाहत तिच्या राजकुमाराची स्वप्न, आहे थोडी वेडी पण मनाने आहे छान अशी ती निराळी....!!!!
निलम काय सांगु हिच्याबद्दल, आपल्यांसाठी साथ देणारी पण खोटयांना शिकवेल अद्दल....!!!!
 विनोद करून सार्याना हसवणारी,
 राग आला बाई साहेबांना की शांत शांत असणारी....!!!!
 थोडी वेडी, थोडी मस्तीखोर, थोडी अल्लड, पण खूप प्रेमळ,
 आहे तिखट तिचे बोल, कोणालाही लागो ठेच डोळे भरती हीचे हीलाच लागे कळ....!!!!
पण एक आहे हिची खासियत,
 वाईटाला हीच्या नजरेत नाही माफीची
 सवलत....!!!!
 आता राहिले मी माझ्या बद्दल आता मीच काय सांगु, निलु, सिद्धी आणि श्रद्धा नेहमी असतात मला ओरडत, स्वताचा विचार कर समाजसेवा सोड, असा कानमंत्र देतात सतत....!!!!
 काही चुकले माझे तर रागावतात ही सार्या,
 पण जिव्हाळा आणि प्रेम ही देतात अशा या माझ्या मैत्रिणी खर्या....!!!!
कोणी ही एकदिवस ग्रुप मधील नसेल आमच्यातील,
 उणीव भासे आणि होई मन चलबिचल....!!!!
ओळख आमची क्षणाची,
 पण मैत्री आमची कायमची.....!!!!!
पण मैत्री आमची कायमची....!!!!! @कviता@

Marathi Kavita : मराठी कविता


Laxman ghadge

  • Guest
Re: मी आणि माझा ग्रुप......
« Reply #1 on: January 11, 2014, 02:59:46 PM »
दोन दिवसाआधी मला फेसबुक वर एक
मैत्रीण भेटली..
आज मात्र तिने मला एक प्रश्न विचारला,
"तुझी गर्लफ्रेंड आहे का ? "
मी म्हटलं
... आता मैत्री करण्यासाठी माझी गर्लफ्रेंड
असणं गरजेच आहे का..
ती म्हणाली तसं नाही, मग
कुणी मैत्रीण तर असेल..
मी तिला म्हटलं," मी कमिटेड आहे "
चटकन ती म्हटली मग आधी खोट
का बोललास..?
आता मला सांग कोण आहे ती..?
अग सोड्ना तुला हे सगळं सांगून काय
फायदा..
पण तिचा हट्ट म्हणून खरं ते सांगितलं
मी कमिटेड आहे..
माझ्या एकटेपणासोबत..
अच्छा मग हे कारण आहे तुझ फेसबुक वर
येण्याच..
मी म्हटल तुला जे वाटेल ते समज पण..?
मला सांग तुझा बॉयफ्रेंड तर असेल ना..?
ती - ये आधीच तू मला ओळखत नाहीस,
आणि वरून वाटेल ते काय बोलतो..
मी - अग मला मनात ठेवायची सवय
नाही जे वाटलं तेच मी बोलतो..
पण मुलींना सवयच असते सर्व जाणून
घेण्याची..
स्वतःच्या मनातलं सारंकाही अलगद जपून
ठेवायची..
ह्या बाईसाहेब हि त्याला अपवाद
नव्हत्या..
मग मी प्रश्न विचारात होतो अन
त्या रिप्लाय करत नव्हत्या..
आता मैत्री करण्यासाठी हि प्रमाणपत्र
बनवावं लागत..
काहीही बोलण्याआधी कमिटेड आहोत
कि नाही हे सांगाव लागत..
खरंच मैत्रीण हवीये मला समजून घेणारी.
कुठलाही संकोच न
बाळगता माझ्याशी मोकळेपणाने
बोलणारी..
तर मित्रांनो मिळेल
का मला अशी मैत्रीण..?

Offline Manoj Jagadale

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
Re: मी आणि माझा ग्रुप......
« Reply #2 on: January 19, 2014, 06:30:43 AM »
khup chan manala sprsh karun jate...