Author Topic: माझा मित्र गोविंद  (Read 1739 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
माझा मित्र गोविंद
« on: March 13, 2014, 12:01:07 PM »
माझा मित्र गोविंद याच्या साठी लिहिलेली ही कविता. (ही गझल नाही, गझल format मधे लिहिलेली कविता आहे)
 
जिथे जिथे गझल तिथे दिसतो गोविंदा
शब्द आणि कला तिथे रमतो गोविंदा

चित्र त्याची भाकरी, श्वास त्याचे गझल
मतल्या साठी जमीन कसतो गोविंदा

कधी वाघ कधी बुध्द, कधी भित्तीचित्र
जीवनात रंग नवे भरतो गोविंदा
 
‘’येता मी वारीला येशील परतुनी’’
विठ्ठलास हामी बघ पुसतो गोविंदा
 
शब्द याचे श्वास हा लांबचा प्रवासी
पुढपुढे गझल मागे पळतो गोविंदा

''सोड रस्ता वाघा'' केदार सांगतो
घेवून शेर खिशात फिरतो गोविंदा
 

केदार...

 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: माझा मित्र गोविंद
« Reply #1 on: March 22, 2014, 12:50:47 PM »
NICE Kedarji.............

Shital dolly

  • Guest
Re: माझा मित्र गोविंद
« Reply #2 on: January 29, 2015, 11:54:21 AM »
maza mitr Avadhut                 :D