Author Topic: फ़क्त मैत्रीच असते...  (Read 7099 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
फ़क्त मैत्रीच असते...
« on: April 17, 2014, 09:47:34 PM »
मैत्री कधीही होते
मैत्री कुठेही होते
नाते मनाशी मनाचे
नकळत पणे जुळते
दोन शब्द बोलता बोलता
मोठे वाक्य होते
हाय बाय करता करता
हृदया पर्यंत जाते
सुरुवात थट्टा मस्करीत
गप्पा गोष्टींत रंगते
इतकी ओढ़ लागते की
सुख दुखही संपते
मैत्री पहावी करून
मैत्री जपावी हरवून
सर्व नात्यांमधे घट्ट
फ़क्त मैत्रीच असते...
फ़क्त मैत्रीच असते...

... अंकुश नवघरे©
     (स्वलिखित)
17/04/2014

Marathi Kavita : मराठी कविता


रोहन

  • Guest
Re: फ़क्त मैत्रीच असते...
« Reply #1 on: May 04, 2014, 06:40:42 AM »
तुला फुल म्हणू कि काटे
स्पर्श तुझा मखमली पण शब्द तुझे टोचे हृदयाला
तुला मैत्रीण म्हणू प्रियसी
ना समजले ना वूमजले
 या मनाला :'(