कवितेचे नाव:- फक्त तू जाऊ नको सोडून..
कवी:- वैभव यशवंत जाधव.
आहे मी गरीब म्हणुनि
जाऊ नको सोडून,
माझेही दिवस येतील
हे घे तू जाणून..
विसरू नकोस तू
ते क्षण जीवनाचे,
अतूट नाते आपले
प्रेमळ मैत्रीचे,
प्रत्येक क्षण ठेवीन जपून,
फक्त तू जाऊ नको सोडून..
सगेसोयरे गेली विसरून
फक्त तू जाऊ नको
नाते आपले तोडून,
नाही तुझविना
जगणं अन् मरणं,..
माझं काही न आवडतं तुला
वागणं की बोलणं,
माहीती होतं हे तुला
तरी तुझं काहीच न बोलणं,..
येती संकटे तुझ्यापुढे
मीच देतो साथ तुला,
आठवतं ना तुला
हे घे तू आठवून...
झाल्या असतील चूका, दुरूस्त करीन मी,
तुझ्याविना मैत्री, कशी टिकवणार मी,
करेन मी प्रयत्न मनापासून
फक्त तू जाऊ नकोस मला सोडून...!!!
Best Friendship........
V.J.