Author Topic: मित्र कोण असतो...?  (Read 3262 times)

Offline Vaibhav Jadhav VJ

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
मित्र कोण असतो...?
« on: January 19, 2015, 08:27:02 AM »
कवितेचे नाव :- मित्र कोण असतो...?
कवी :- वैभव यशवंत जाधव.


मित्र कोण असतो ? मित्र कसा असतो ?
प्रत्येक क्षणाला मदत करणारा,
प्रत्येक पावलाला साथ देणारा,
तोच खरा मित्र असतो...!

तेच नाते बनते प्रेमाचे,
तेच नाते बनते विश्वासाचे,
हसणं-रडणं असतं त्यात,
तोच आपुलकीचा दिलासा देतो,
तोच खरा मित्र असतो....!

हे नाते बनते आपोआप,
त्याला न लागे कुणाचा आधार,
आपल्या मनामध्ये सतत ठसतो,
तोच खरा मित्र असतो....!

पाहिलेलं कधी खरं नसतं,
खरंदेखील कधी खोटं असतं,
रोज हसत जा माझ्यासाठी,
तुझविना मैत्री नाही कुणाशी,
याची जाणीव करून देतो,
तोच खरा मित्र असतो....!

काहीच नाही माझ्याशी लपून ठेवी,
सत्य काय आहे ? मला सांगतो,
मनातील सगळ्या भावना व्यक्त करितो,
तोच खरा मित्र असतो....!

अन् तोच मित्र सदैव पाठिशी राहतो...!

Marathi Kavita : मराठी कविता