Author Topic: मित्र-प्रेम  (Read 2359 times)

Offline Vaibhav Jadhav VJ

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
मित्र-प्रेम
« on: February 12, 2015, 07:58:02 PM »
 कवी :- वैभव यशवंत जाधव.

पाहिलं मी एका मुलीला
मनात माझ्या ती बसली
सांगितलं मी एका मित्राला
त्याच्याही मनात ती ठसली....!

दिसायला खुप चांगली
अन् बोलायला खुप बोलकी
नाही मला,नाही त्याला मग
कुणास बघून ती हसली...!

होते प्रेम तिचे माझ्यावर
सांगितले मैत्रिणीने मला
नाव तिचे मित्राच्या हातावर
कसे सांगणार मी त्याला..!

केला मी खुप विचार
त्या प्रियेशी केले भांडण
नाही प्रेम माझे तुझ्यावर
म्हणुनी मित्राचे केले मिलन.!

*मित्रांसाठी कुणी करितो काहीपण
कुणी विसरत जगणं अन् मरणं
त्या मित्रांना वंदन मनापासून
अन् याच मैत्रीसाठी प्रेम माझं कुरबान .....!

Marathi Kavita : मराठी कविता