Author Topic: नजर नलागो तुला  (Read 1888 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
नजर नलागो तुला
« on: August 02, 2015, 08:05:24 AM »
नजर नलागो तुला
तुझी नजर मी काढतो
वाईट नजर ना पडो तुझ्यावर
म्हणुन आपल्या मैत्रीचा पडदा धरतो

नजर न लागो तुझ्या डोळ्यांना
म्हणुन आपल्या मैत्रीच काजळ भरवतो
नजर न लागो चंद्राची तुला
म्हणुन तुला रात्री फिरण्यास नाही सांगतो

नजर न लागो तुला
तुझ्या गालावर मैत्रीच काजळ लावतो
नजर न लागो आरशाची तुला
म्हणुन आरशात तुला मीच दिसतो

नजर न लागो माझी तुला
म्हणुन तुला भेटण्यास घाबरतो
कोणाचीही नजर न लागो तुला
असे साकडे देवाकडे घालतो

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता