Author Topic: मैत्री नावाचे चॅप्टर  (Read 2632 times)

Offline pallavi wadaskar

  • Newbie
  • *
  • Posts: 14
  • Gender: Female
मैत्री नावाचे चॅप्टर
« on: October 18, 2015, 08:17:12 PM »
जीवनात मैत्री नावाचे चॅप्टर नसते
तर आयुष्य किती उदास असते
कॅंटीन मधे बसून सुद्धा
भरलेली चाय ची कप
रिकामी वाटली असती

कट्ट्या वर निवांत बसलेलो असले
तरी मनात असंख्य प्रश्नाचे
उत्तरे वादळी वाऱ्यागत उसळू लागले
असती


कधी बेंच तर कधी नोटबुक
या चे तबला बनवून
आयुष्याचे संगीत
तयार करणेच विसरले असते


क्लास संपल्यावर होणाऱ्या गप्पा
सोबतच वादविवाद  नि
दुसऱ्यांच्या टिंगल्या उडवणे
हे कधी अनुभवल्या गेलेच नसते


pallavi wadaskar....


Marathi Kavita : मराठी कविता