आयुष्य एकट्याने जाईल कसं बरं?
मिञ नसला कि फाटल ईतभर
पुढे सरकू नाही शक्य टिचभर
त्याचाच आहे आता सगळीकडे वावर
मैतर माझा मैतर जीवलग माझा
जीवाचा दिलबर
धावून येतो येता माझी खबर
मी असलो असलो जरी डफर
दुखं होऊ देत नाही टुसभर
मिञ माझा आहे एक नंबर
मैतर माझा मैतर जीवलग माझा
जीवाचा दिलबर
त्याचं माझ्यावर प्रेम त्याची माझ्यावर मया
तो असताना येत नाही संकट कणखर
विसर त्याचा करू शकत नाही क्षणभर
त्याच्या हृदयामध्ये आहे प्रेम माझ्याकरिता मनभर
मैतर माझा मैतर जीवलग माझा
जीवाचा दिलबर