तुझ्या माझ्या नात्यात तसं तर काही नाही,
पण तरीही ख़ास असं हे नातं आहे..
जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, सावरलेपण ज्यात आहे..
एकमेकांचे स्थान, एकमेकांच्या हृदयात आहे..
आणि या नात्याचा खरा आनंद माझ्या जीवनात आहे...
कसे अतूट आहेत या नात्याचे रुनानुबन्ध
त्यातून उतराई होणं सहज नाही,
जिथे नकळतच सगळं कळत जातं
तिथे शब्दांची गरज नाही,
मग बेधुंद स्वरानी मंत्र-मुग्ध होतात दिशा
जेव्हा कळते मनाला मैत्रीची भाषा!
या स्नेहाच्या वर्षावात मन आनंदून जातं
मग सर्वाना हेच सांगावसं वाटतं
सर्वांपेक्षा वेगळं आहे ... हे आपल्या मैत्रीचं नातं..!!
--जय