"हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून"
--------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "हॉलिवूडची इंग्रजी गाणी मराठीतून" या शीर्षकI-अंतर्गत हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बँड पथक-"a1", यांचे एक भाषांतरित,अनुवादित गाणे. या गाण्याचे शीर्षक आहे-"Do It Again"-"ते पुन्हा कर"
"ते पुन्हा कर"
-------------
"Do It Again"
"ते पुन्हा कर"
---------------
तुला नुकताच स्वर्ग सापडला आहे
तुला वाटतंय हे सारं सोपं आहे
तो पुन्हा मिळवणं हे फार सुरक्षित आहे.
थोड्याच काळापूर्वी तुला कुणीतरी हवं होतं
कुणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेवून रडायचं होतं
आणि आता तुला माझा आधार हवा होता
आणि तुला आता माझी मदत हवी होती
तू संपूर्ण रात्र मूर्खच बनवतं होतास
तू तिचा कमीपणाचं दाखवत होतास
ही गोष्ट मुळात योग्यच नव्हती
ही तर तीच जुनी परत परत घडणारी होती.
तुझ्याकडे पहा जरा एकदा
तुझ्या आयुष्याकडे पहा एकदा
तुला नुकताच स्वर्ग प्राप्त झाला होता
आणि तो तू लाथाडून टाकला होता
असं म्हणायला हवं तू ते पुन्हा करशील ?
ते तू पुन्हा कसं बरं मिळवशील ?
पण मी तुझ्याचसाठी आलोय इथे, मित्रा
पुर्वीसारखंच तू आताही करशील ते, मित्रा.
तू पाठच दाखवून गेला होतास त्या मुलीला
धिक्कार असो तुझ्या या विश्वास ठेवण्याला
धिक्कार असो तुझंI माझ्यावर आळ घेण्याला
आणि आता तू स्वतःच उदास होऊन बसतोस
केलेल्या कर्माचे तू प्रायश्चित्तच जणू घेतोस
मी तुला आता कसं काय समजावू
तीच तीच जुनी गोष्ट पुन्हा आणि पुन्हा.
तुझ्याकडे पहा जरा एकदा
नीट निरखून पुनः पुनः पहा
तुझ्या आयुष्याकडे पहा एकदा
तुला नुकताच स्वर्ग प्राप्त झाला होता
आणि तो तू लाथाडून टाकला होता
असं म्हणायला हवं तू ते पुन्हा करशील ?
तुला माहितीय तू ते पुनः करशील
ते तू पुन्हा कसं बरं मिळवशील ?
नाही तू ते मिळवूच शकणार नाहीस
पण मी तुझ्याचसाठी आलोय इथे, मित्रा
पुर्वीसारखंच तू आताही करशील ते, मित्रा.
माझा विश्वासच नाही बसत तुझ्यावर
आश्चर्यातच पडलोय मी तुझ्या हातून हे घडल्यावर
तुला तुझं मन बघ कसं खातंय
तुझं हृदय कसं तुकड्या तुकड्यात विभागतंय
जिथून झाली होतं सुरुवात तुझी
तिथेच तुला हे नशीब घेऊन जातंय.
आता तू स्वतःच उदास होऊन बसतोस
केलेल्या कर्माचे तू प्रायश्चित्तच जणू घेतोस
मी तुला आता कसं काय समजावू
तीच तीच जुनी गोष्ट पुन्हा आणि पुनः, रे मित्रा.
तुझ्याकडे पहा जरा एकदा
नीट पाहून घे एकदा
तुझ्या आयुष्याकडे पहा एकदा
तुला नुकताच स्वर्ग प्राप्त झाला होता
आणि तो तू लाथाडून टाकला होता
असं म्हणायला हवं तू ते पुन्हा करशील ?
ते तू पुन्हा कसं बरं मिळवशील ?
ओह, नाही नाही नाही
पण मी तुझ्याचसाठी आलोय इथे, मित्रा
पुर्वीसारखंच तू आताही करशील ते, मित्रा.
तुझ्याकडे पहा जरा एकदा
तुझ्या आयुष्याकडे पहा एकदा
तुला नुकताच स्वर्ग प्राप्त झाला होता
आणि तो तू लाथाडून टाकला होता
असं म्हणायला हवं तू ते पुन्हा करशील ?
ते तू पुन्हा कसं बरं मिळवशील ?
पण मी तुझ्याचसाठी आलोय इथे, मित्रा
पुर्वीसारखंच तू आताही करशील ते, मित्रा.
--a1
------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-az-लैरिकस.कॉम)
------------------------------------------
-----संकलक आणि अनुवादक
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.03.2023-रविवार.
=========================================