मैत्रिणीनं मैत्रिणीसारखं रहावं...
चेष्टा केली कि चापट द्यावी
आणि शांत बसलं कि टपलीत द्यावी
ना बोलता येणाऱ्या आठ्या पाहाव्या
एक छान गोष्ट सांगून त्या पळवाव्या
काळजी डोळ्यातून , वागण्यातून वाहावी
जाणीव न करू देता जबाबदारी घ्यावी
मैत्रिणीनं मैत्रिणीसारखं रहावं...
गंभीर झालं वातावरण कि जाऊ दे रे म्हणावं
मतं वेगळी असतांनाही नात्यात घट्ट ठेवावं
हक्कानी बोलतं करावं मनाचं कारंज
धक्के खातांना बनावं मऊ स्पंज
ऊन पावसात असावा तिचा इंद्रधनूचा वेढा
तिखट आंबट जीवनात तीच केशर पेढा
संकटांना बिन्धास भीड म्हणत व्हावं कोकण कडा
चूक झाली कि कान पिळून शिकवावा योग्य धडा
मैत्रिणीनं मैत्रिणीसारखं रहावं...
लाखात एक असूनही साधं असावं
तिची सोबत मायेचं पांघरूण वाटावं