मैत्रीण
अबोल जगाशी ,बोलकी माझ्याशी
शहाणी एका क्षणी, दुसऱ्या खट्याळशी
मनातला मोर , सहज खुलवे कशी
सख्खी मैत्रीण , लाखात एक जशी
लावे जीव, घाली फुंकर, उन्हातली हवा
कठोर मना, करी नाजूक , थेंबांची किमया
हसू तिचे, ताण मिटवे, दिवाळीतला मंद दिवा
आसू थांबवी, गळण्याआधी, तिची आभाळमाया
तिखट आंबट, जीवनात, केशर पेढा
ऊन पावसात, इंद्रधनूचा , जणू वेढा
उभी ठाम , कणखर , कोकण कडा
झाली भूल जर , शिकावी , योग्य धडा
साथ तिचा , वसंत बहर, उमेद देई
सुख वाढे , दुख्ख झडे , काळजी घेई
वळणावर , हर एक, सावलीगत उभी राही
सखी अशी , पदरात आली , नशिबानं बाई