Author Topic: मैत्रीचा शोध .........  (Read 5440 times)

Offline neeta

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Female
मैत्रीचा शोध .........
« on: June 09, 2011, 03:49:36 PM »
मैत्रीचा शोध .........

जन्माला येतो तेव्हा, नात्याचे जाळे तयार असते ,
तरी प्रत्येक जण जीवनात, खऱ्या मैत्रीच्या शोधात असते ,

मैत्री" , शब्द उच्चारताच, आपलेपणाची जाणीव होते,
मनही मग दुख, पेलला हसत-हसत तयार होते,

गरज नसते पुराव्याची , जेथे मैत्रीचा विश्वास असतो ,
मैत्रीच्या या नात्याला, समजूतदारपणा हवा असतो,

इतर नात्यापेक्षा, हे नाते काहीतरी वेगळे असते,
या नात्यात एक गुप्त धन लपलेले असते ,

न बोलता मनातील वेदना एकमेकांना कळत असतात ,
न कळत डोळ्यात, त्या पाणी भरत असतात,

स्वावलंबन घडविणाऱ्या विचारांची , जाणीव मैत्री करून देते ,
चुकताना कटू शब्दांचा, ती अर्थ समजून जाते ,

दुखाच्या क्षणी, ती धीर बनत असते ,
तर सुखामध्ये, आनंद द्विगुणीत करत असते ,

भाग्यवान आहे मी , मला खऱ्या मैत्रीचा सहवास लाभला ,
आणि .......... मैत्रीचा शोध माझा इथेच संपला .

धन्यवाद ..............
निता.............................................

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा दहा किती ?  (answer in English):