Author Topic: मैत्री ......  (Read 3047 times)

Offline महेश मनोहर कोरे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 158
  • Gender: Male
  • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
मैत्री ......
« on: December 19, 2011, 08:41:22 PM »
मनाचा गुंता कि गुंत्यातल मन ....?
सांगण कठीण पण ऐकतंय कोण ...?
प्राजक्ताचा सडा, त्यातला सुगंध ...
जाणीव आहे पण वेचतंय कोण ...?
शब्दांची गुंफण , गुंफनातील गाणी ...
सुरेल आहेत पण गातंय कोण .....?
पावसांच्या धारा , धारांचा शहारा...
घ्यावासा वाटतो पण भिजणार कोण ...?
मित्रांचा सहवास कि सहवासातल प्रेम ...
आठवत नाही पण विसरतय कोण .....?
 
                                          महेश कोरे ....

Marathi Kavita : मराठी कविता