Author Topic: स्वप्ने.... ( पुढे चालू...)  (Read 9948 times)

Offline VIRENDRA

 • Newbie
 • *
 • Posts: 16
स्वप्ने.... ( पुढे चालू...)
« on: February 09, 2010, 03:13:40 PM »
स्वप्ने....   ( पुढे चालू...)   
                         हा हा म्हणता अनेक आकडे पुढे सरसावले. आपल्या अंतरीचे हितगुज मला सांगू लागले. अनंत इच्छा, असंख्य अशा, अगणित स्वप्ने यांचे केवढे सुंदर आणि विशाल संमेलन होते ते.  ' I have a dream ' असे म्हणणाऱ्या मानवतावादी मार्टिन  लुथर  किंग प्रमाणे प्रत्येक अक्ड्यामागे उभ्या असलेल्या  तरुण मनाने एक-एक सुंदर स्वप्नं आपल्या उराशी धरले होते! सुवासिनीने पदराखाली सांजवातीचे निरंजन घ्यावे तसे! मार्टिन  लुथर  किंग सारखे महात्मे विश्वव्यापी स्वप्ने पाहतात. त्यांच्या स्वप्नांना गरुडाचे पंख असतात.आकाड्यामागून भिर-भिरणाऱ्या डोळ्यांनी भविष्याकडे पाहणाऱ्या या चिमण्या जीवांची स्वप्ने त्या मानाने फार लहान असतील. पण त्या आणि या स्वप्नांची जातकुळी एकच आहे. या चिमुकल्या स्वप्नांना फुलपाखराचे पंख असतात, या पंखांचे रंग किती नाजूक, किती सुंदर,किती विविध ! संध्यारंगानी भरलेल्या पश्चिमेच्या प्याल्यात इंद्रधनुष्याचा कुंचला  बुडवून नक्षत्रांचा जरतारी शालू नेसलेली रजनीच जणू हे पंख रंगवीत  असते.!
 
                         स्वप्ने लहान असोत वा मोठी, ती वास्तवाच्या शुद्र,कुरूप आणि निरस जगातून आपल्याला एका भव्य आर्त, रमणीय जगात क्षणभर का होईना, घेऊन जातात.स्वप्नांचे मोठेपण त्यांच्या या दिव्यं शक्तीत आहे.उषेने स्वप्नात अनिरुद्धला पहिले, ती त्याच्या प्रेमात पडली. त्याचा तिने ध्यास घेतला.हरिश्चंद्राने स्वप्नात विश्वामित्राला राज्य  दानाचे वचन  दिले. ते  खरे करण्यासाठी जागेपणी अठराविश्वे दारिद्र्य स्वीकारले. पहिली एक नाजूक प्रणय कथा तर दुसरी एक उदात्त करुण कथा, पण दोन्ही कथा अमर आहेत. कारण दोनीही खऱ्या-खुऱ्या  स्वप्नकथा आहेत.
 
                          समोरच्या पानातील आकड्यांनी मला अशा अनेक स्वप्नाकथा ऐकवल्या. दैनिकाचा तो अंक मी प्रथम हाती घेतला तेव्हा त्या आकड्यांच्या रांगा पाहून चटकदार बातम्या वाचायला चटावलेल्या माझ्या मानाने तो दूर फेकला होता ! ते कृत्य किती अरसिकपनाचे होते! ते आकडे मुंग्याच्या रांगासारखे दिसत होते हे खरे; पण या मानवी मुंग्या होत्या - अशा मुंग्या कि ज्यांना सुंदर स्वप्ने पडतात आणि ज्या त्या स्वप्नावरच जगतात.या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणूस प्राणी मुंगी सारखा आहे हे कोण अमान्य  करील?   
पण या मुंगीचे मोठेपण एकाचं गोष्टीत आहे -
  विश्वाला गवसणी घालणारी स्वप्ने ती पाहू शकते, इतकेच नव्हे तर त्यातली अनेक साकार हि करू शकते !!


....समाप्त.


लेखक -  वि. स. खांडेकर
          (आलमगीर- १९६८.)
 
   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 228
 • Gender: Female
Re: स्वप्ने.... ( पुढे चालू...)
« Reply #1 on: July 31, 2013, 11:33:36 AM »
khup chan

Deva s s balule

 • Guest
Re: स्वप्ने.... ( पुढे चालू...)
« Reply #2 on: January 19, 2016, 06:56:16 PM »
एक पत्नीने आपल्या पतीजवळ मांडलेली भावना प्रधान कविता …………

कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी,
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी,
यासारखं सुख ते काय?

कधीतरी भांडताना
एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम
दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?

कधीतरी रविवारी
सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून
आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?

कधीतरी रडताना
तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले
की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?

कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?

कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?

कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं
सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?

कधीतरी जगताना
जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं,
यासारखं आयुष्य ते काय?

Offline vbhutkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 94
Re: स्वप्ने.... ( पुढे चालू...)
« Reply #3 on: May 20, 2016, 08:28:19 PM »
Thank you for sharing my poem here. But it would be great if you can add my name and page link at the end of the poem. :)

Here is the details:

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/


Thanks,
Vidya.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):