Author Topic: सांग सांग डोरीमोन!  (Read 2408 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,415
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
सांग सांग डोरीमोन!
« on: March 19, 2013, 11:41:58 AM »
सांग सांग डोरीमोन!

सांग सांग डोरीमोन!
एक gadjet मिळेल काय!
अन त्याच्यासंगे;
उंच उंच उडून मी;
नभातल्या त्या टिमटिमत्या
ताराकांशी खेळू शकेन का?

सांग सांग डोरीमोन!
एक gadjet मिळेल काय!
अन त्याच्यासंगे;
उंच उंच उडून मी;
गगनातल्या त्या
रंगीबीरंगी फुलपाखरांशी;
गुजगोष्टी सांगू शकेन का?

सांग सांग डोरीमोन!
एक gadjet मिळेल काय!
अन त्याच्यासंगे;
उंच उंच उडून मी;
आभाळाला टेकलेल्या;
निसर्गसौंदर्याने नटलेल्या;
त्या पर्वतांना स्पर्श करू शकेन का?

सांग सांग डोरीमोन!
एक gadjet मिळेल काय!
अन त्याच्यासंगे;
खोल खोल जाऊन  मी;
निळ्या निळ्या सागरातल्या;
निळ्या, पिवळ्या, तांबड्या;
त्या मास्यांना स्पर्श करू शकेन का?

सांग सांग डोरीमोन!
एक gadjet मिळेल काय!

मिलिंद कुंभारे

« Last Edit: March 19, 2013, 01:40:06 PM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता

सांग सांग डोरीमोन!
« on: March 19, 2013, 11:41:58 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):