Author Topic: चांदोबाची गमाडी - गम्मत !  (Read 1737 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
चांदोबाची गमाडी - गम्मत !
« on: February 20, 2012, 08:53:55 AM »
चांदोबाची गमाडी - गम्मत !
(पुरंदरे शशांक)

चांदोबाची गमाडी - गम्मत !

चांदोमामा गोलम गोल
गोल गोल ढोल मटोल

केला आईकडे हट्ट खूप
कमी झाले साखरतूप

साखरतूप कमी झाले
चांदोबा बिचारे रडू लागले

रडता रडता मुळुमुळु
चांदोबा वाळले हळुहळु

रुसुन चांदोबा दडून बसले
कोणालाही नाही दिसले

आईने पुन्हा देता खाऊ
चांदोबा हसून लागले डोकाउ

हसतात कसे ओठातून
चंद्रकोर दिसते उठून !
« Last Edit: February 20, 2012, 08:54:19 AM by shashaank »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: चांदोबाची गमाडी - गम्मत !
« Reply #1 on: February 21, 2012, 10:59:46 AM »
khup  chan....