Author Topic: Birds Idol (बालगीत)  (Read 5948 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
Birds Idol (बालगीत)
« on: February 22, 2011, 07:58:30 PM »

Birds Idol
एकदा साऱ्या पक्ष्यांचे Birds Idol भरले.
Judge म्हणून तोता मैना आणि मोर ठरले.

झाडून साऱ्या पक्ष्यांच्या audision झाल्या.
सर्वांनी आपापल्या विविध सरगम गायल्या.

गायना साठी आला कोंबडी सह कोंबडा.
कुकूचकू करून पठ्यान dance केला रांगडा.

चिऊ आणि काऊ गायला जोडीन आले.
चिव-चिव काव-काव मस्त मजेन गायले.

वटवाघूळ अन घुबडाची स्वारी झोपेतच आली.
दिवसा गाता न आल्यान त्याची फजिती झाली.

कोकिळेला होता स्वता:च्या आवाजाचा गर्व.
म्हणे नाही गाणार जर गाणार असतील सर्व.

कबुतराला गायला हजर राहता नाही आलं.
अचानक एक Urgent निरोप द्यायचा गेलं.

उंच –उंच आभाळात फिरत राहीली घार.
गायला यायला तिला उशीर झाला फार.

मासोळी साठी बगळ्याने समाधी लावली पाण्यात.
Mood नाही आला त्याला गायला येण्यात.

अंतिम गायकांची लिस्ट जारी झाली.
चक्क चिऊ आणि काऊ final ला आली.   

चिऊला खालची पट्टी उत्तम जमली.
गाताना वरच्या पट्टीला ती फारच दमली.

काव काव गायनानं काउवर परीक्षक चिडले.
पण SMS च्या संख्येन त्याचे गुण खुप वाढले.

पण शेवटच्या फेरीत काऊ कुहू कुहू करून नाचला.
पहिला  Birds Idol जिंकून काऊने इतिहास रचला.

वर्षानुवर्षेचे उपकार कोकिळेने असे फेडले.
काऊ ऐवजी stage वर कुहू कुहू गीत गायले.


कवी :  बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब  तानवडे – २२/०२/२०११
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
 प्रतिक्रीया अपेक्षित
« Last Edit: February 28, 2011, 01:41:51 PM by बाळासाहेब तानवडे »

Marathi Kavita : मराठी कविता