Author Topic: आभाळात आले किती .  (Read 1630 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
आभाळात आले किती .
« on: May 04, 2013, 04:12:55 PM »
आभाळात आले किती .... काळे काळे ढग

आभाळात आले किती .... काळे काळे ढग
येना बाहेर लवकर आई ....बघ वर बघ

आरडाओरडा कित्ती यांचा .... गडाडगुडूम
वीज कशी मधूनच .....जाते सणाणून

वारे कसे घोंघावती .... आवाज करून
पाला पाचोळ्याने गेले .... आभाळ भरून

टपटप टपटप आले आई .... थेंब हे वरून
भिजू मस्त पावसात ..... गोल गोल फिरून

गाणे गाऊ पावसाचे ..... हात उंचावून
ये ना आई लगेच बाहेर .... काम दे सोडून


-shashaank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

  • Jr. Member
  • **
  • Posts: 145
  • Gender: Male
Re: आभाळात आले किती .
« Reply #1 on: May 13, 2013, 09:19:46 PM »
 :) mast