Author Topic: गुणाऽची मनी ..  (Read 1875 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
गुणाऽची मनी ..
« on: August 10, 2013, 11:36:47 AM »
गुणाऽची मनी ..

मने माकडे, किती गं लोळते ?
नऊ वाजून गेलेत तरीही झोपते ??  >:(

तुला ना शाळा, अभ्यास काही
दिवसा - रात्री लोळतात बाई !!  :)

सापडत नाहीए हेअरबँड माझा !!!
तुला काय त्याचे, वाटत असेल मजा ...  >:(

कित्ती तो इथे झालाय पसारा ...
अगं, तुझी आधी शेपूट आवर जरा ..  :'(

उठ आधी माझ्या दप्तरावरून
जायचंय शाळेत बाईऽ, सारं आवरुन  >:(

जातेय मी शाळेत, आल्यावर भेटू
तोपर्यंत आपली न्हेमीची टाटू  ;)

कित्ती गं माझी गुणाऽची मनी
बाय बाय करते शेपूट ऊंचाउनी ...  :)


-shashaank purandare

Marathi Kavita : मराठी कविता