Author Topic: दिव्या दिव्या दीपत्कार  (Read 3100 times)

Offline aap

  • Jr. Member
  • **
  • Posts: 94
दिव्या दिव्या दीपत्कार

दिव्या तुझी स्थित्यंतरे
आम्ही भाग्यवान खरे

जगती तू या नसतास
डोळे असुनी दिसले नसते रात्रीच्या अंधारात

प्रथम होतास तू दिवटी
गरिबांच्या राहुटी

मग मातीची झाली पणती
तिन्हीसांजा मिणमिणती

समई निरांजन देवादारी
म्हणा परवचा शुभंकरी

काचकंदील घरोघरी
हंड्या , झुंबर राजमंदिरी

ग्यासबत्ती शिरावरती
रात्रीच्या निघती वराती

कालांतरे झाली प्रगती
गावोगावी  विजबत्ती

झगमगती मंदिर शिखरे
प्रकाशती घरेदारे

स्वतः जळूनी देतोस तू प्रकाश
तव वर्णाया अपुरा शब्दकोश

सौ . अनिता फणसळकर