Author Topic: आम्चं बाळ...  (Read 2102 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
आम्चं बाळ...
« on: July 22, 2014, 11:05:26 AM »
आम्चं बाळ...

पाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ
चळवळ करुन दमलंय पार

इटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण !!!
डोळे टकाटका नी डोके पार चमन ..
:)

इटुक्लं बाळ चालवते सायकल
हाता-पायांची किती ती वळवळ
;)

इटुक्लं बाळ काय काय सांग्ते
आईला माझ्या बरोब्बर कळ्ते
  :D

इटुक्लं बाळ ओळख्ते हां मला
नसूं दे बोलत पण कळ्तं ना मला
  :)

इटुकल्या बाळाची मी ताई किनै
खेळ्तं माझ्याशीच कध्धी रडत नै
  ;)

आई ग्ग लवकर ये ना जरा
केला बै याने फ्रॉक माझा ओला ...
  :(

-shashaank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता