Author Topic: शाळा  (Read 3553 times)

Offline bhaskar.amrutwar.facebook

  • Newbie
  • *
  • Posts: 2
शाळा
« on: August 08, 2014, 09:50:53 AM »
॥  शाळा  ॥

सकाळ झाली
कोंबडा आरवला,
मुले म्हणाली
शाळेला चला.

खाऊचा डब्बा
आईने केला,
गरम चिवड्याचा
नाश्ता झाला.

रवि आला,
सोनी आली,
शाळेत जाणाऱ्यांची
गर्दी झाली.

आली पहा
आमची शाळा,
मैदानावर
जमला मेळा.

घणघण घणघण
घंटा वाजली,
नवीन दिनाची
सुरुवात झाली.

  - भास्कर अमृतवार, नांदेड.

Marathi Kavita : मराठी कविता