Author Topic: ऊठा ऊठा चिऊ ताई ..  (Read 3732 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
ऊठा ऊठा चिऊ ताई ..
« on: August 10, 2014, 05:51:14 PM »
ऊठा ऊठा चिऊ ताई ..  (  बालकविता ) 
.
ऊठा ऊठा चिऊ ताई
बघा सकाळ आता झाली
गोड सानूल्या बाळाची
आता शाळा सूरू झाली
.
ऊठा ऊठा चिऊ ताई
बाळाला अंघोळ आता घाला
काजळ पावडर लाऊन छान
रंगीत कपडे त्याला घाला
.
ऊठा ऊठा चिऊ ताई,
बाळ भूकेलं ते झालं
खाऊ घाला दोन दाणं,
त्याच पोट छोट्ट झालं
.
ऊठा ऊठा चिऊ ताई
खुप झाले तुमचे नखरे
झाली सगळीकडे सकाळ
जागी झाली सगळी पाखरे
.
©  चेतन ठाकरे Marathi Kavita : मराठी कविता