Author Topic: एक चिमणी रडली  (Read 3513 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
एक चिमणी रडली
« on: November 13, 2014, 09:51:48 AM »
एक चिमणी रडली
घरासाठी अडली
खोप्यासाठी जागा नाही
काचे आड दडली ! !

उंच उंच बिल्डींग
त्यात काचेची फील्डींग
जात होती वर वर
पाय घसरुन पडली
एक चिमणी रडली
घरासाठी अडली ! !

जवळी दिसती छोटी झाडे
जाईल कसे आत ती
मधेच त्याच्या कुंपण आडवे
स्वार्थासाठी माणसांनी
झाडे मोठी तोडली
एक चिमणी रडली
घरासाठी अडली ! !

ना दिसती तिला
मोकळी राने
ना टाकती तिला
कुणी दाने
त्रास होतो तिला
धुर अन्  भोंग्याने
पाणी पिण्या गेली तर
टाकी मधे पडली
एक चिमणी रडली
घरासाठी अडली ! !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता

एक चिमणी रडली
« on: November 13, 2014, 09:51:48 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: एक चिमणी रडली
« Reply #1 on: November 13, 2014, 06:17:57 PM »
छान जमून आलीये बर का संजयदा... आवडली..!

Re: एक चिमणी रडली
« Reply #2 on: November 19, 2014, 07:39:38 PM »
मस्त कविता.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):