Author Topic: बोबडकांदा  (Read 1387 times)

बोबडकांदा
« on: November 18, 2014, 02:28:47 PM »
बोबडकांदा
(२४ ऑगष्ट १९९७ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज'मध्यें प्रकाशित)

थदले मला तिलवतात
बोबलतांदा बोबलतांदा
मला त्यांता लाद येतो
तलतो मद मी त्यांता वांदा

एतदा मी आईला म्हतलं
"दे ना मला थोलं थोबलं"
आई म्हनाली "नीत बोल
थोलून दे हे बोलनं बोबलं"

लादावलो मी थूप तेव्हां
लुतून बतलो तोपल्यात दाऊन
आईतं लत्थ नव्हतं तेव्हां
थदलं थोबलं तातलं थाऊन

ताई आनि दादा थुद्दा
तिलवून मला हैलान तलतात
"बोबलतांद्या,बोबलतांद्या"
अथीत मला हात मालतात

तोनावल मादा विथ्वात नाही
तुमीत आता मला थांदा
तुमालाही वाततं ता हो
आहे मी एत बोबलतांदा ?

Marathi Kavita : मराठी कविता